Today’s Horoscope 09 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार शनिवार . …. ​दि​.  09 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार – १३ नंतर चांगला.
  • आज विशेष – सफला एकादशी.
  • राहू काळ -सकाळी ९.०० ते  १०.३०
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा १२.३२ पर्यंत, नंतर अनुराधा.
  • चंद्र राशी – वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग- जांभळा)

कोणत्याही नवीन कामास प्रारंभ आज नको. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा. वैवाहिक जीवनात थोडे फार मतभेद असतील. पण फार न ताणता तुम्ही ते सामंजस्याने घ्याल.

वृषभ – (शुभ रंग- मोरपिशी)

आज जिवलग मित्र दिलेले शब्द पाळणार आहेत. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. मोठ्या लोकांच्या ओळखी अडचणीच्या प्रसंगी कामी येतील. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

मिथुन – ( शुभ रं ग – मोतीया )

व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मोलाचा असेल. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

कर्क- ( शुभ रंग – मरून)

आज आर्थिक आवक उत्तम राहील. मुलांच्या मागण्या हौशीने पुरवाल. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो.

सिंह- ( शुभ रंग- डाळिंबी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात या वेळात होईल पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे होईल. घर सजावटीच्या शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल मुलांना दिलेले शब्द पाळाल.

कन्या- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

घरात काहीतरी कारणाने वडिलधार्‍यांशी मतभेद होऊ शकतात. भावंडांचे मात्र आज एकमेकांना चांगले सहकार्य राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. वाहन दुरुस्ती चा खर्च उद्भवू शकतो.

तूळ- ( शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. तुम्ही सहजच घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. ज्येष्ठ मंडळींना कदाचित डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल

वृश्चिक- ( शुभ रंग- केशरी)

आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कर राहील. घरातील थोरांशी काही क्षुल्लक कारणांवरून वाद होतील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येईल.

धनु- ( शुभ रंग- आकाशी )

व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाव्या लागतील. जुने विचार गुंडाळून ठेवावे लागतील.  आज बिनधास्त खर्च करा. बचतीचा विचार सोडून द्या.

मकर- ( शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील. काही रखडलेली किचकट कामेही मार्गी लागतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळू शकेल.

कुंभ – ( शुभ रंग -पांढरा )

आज तुम्ही रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल आपल्या कामातील तत्परतेने वरिष्ठांची मने जिंकाल. आज एखाद्या मित्राबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

मीन – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. यथाशक्ती दानधर्म कराल. वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान राखाल. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.