Today’s Horoscope 09 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – शुक्रवार दि. 09 जुलै 2021

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – दर्श अमावस्या.
  • राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आर्द्रा २३.१४ पर्यंत नंतर पुनर्वसु.
  • चंद्र राशी –  मिथुन.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- तांबडा)

आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो.

वृषभ – ( शुभ रंग – मोतिया)

आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा  सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज गरजेपुरतेच बोला.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तुळ – (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात आज तुम्हाला जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल.  इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा)

नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.

कुंभ – ( शुभ रंग- भगवा )

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.