Today’s Horoscope 09 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 09 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

09.06.20323.

 शुभाशुभ विचार- वैधृती वर्ज्य.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ- सकाळी 10.30 ते 12.00. 

 दिशा शूल – पश्चिमेस असेल.

 आजचे नक्षत्र – धनिष्ठा 17.09 पर्यंत नंतर शततारका. 

 चंद्र राशी – 06.02 पर्यंत मकर नंतर कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास किंमत राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा. आज म्हणाल ती पूर्व.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांना दोन हात दूरच ठेवलेले बरे.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )

आजचा दिवस उद्योग धंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल असल्याने महत्त्वाची कामे उद्यावरच ढकला. नोकरदरांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होऊन बसेल.

कर्क (शुभ रंग- राखाडी.)

आज कोणत्याही प्रकारचे धाडस नको. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला. जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

सिंह (शुभ रंग- निळा )

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहभातीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)

तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधाकट असेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरदारांना आज ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल.

धनु- (शुभ रंग- मरून)

ऑफिस कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडतील. साहित्यिक मंडळी दर्जेदार लिखाण करतील. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील गृहिणींना शेजार धर्म पाळावा लागेल.

मकर ( शुभ रंग- भगवा )

कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील. व्यवसायात आज आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी आत्मविश्वासाने स्वीकारून पूर्ण कराल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

काहींना तातडीचे दुरचे प्रवास घडतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क- 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.