Today’s Horoscope 09 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – मंगळवार – 09 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार –  चांगला दिवस.
  • आज विशेष – विजया एकादशी.
  • राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा 21.41  पर्यंत, नंतर श्रवण.
  • चंद्र राशी – मकर.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – गुलाबी)
आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असेल. तुमचा नोकरी व्यवसायातील मानसन्मान वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. दगा देणारे मित्र भेटू शकतात.

वृषभ – (शुभ रंग – डाळिंबी)
आज आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. वाढत्या जबाबदाऱ्यांचे थोडे दडपण येईल. रिकामटेकड्या मित्रमंडळींना दुरूनच रामराम करणे हिताचे. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची प्रचिती येईल.

मिथुन – (शुभ रंग – मरून)
नवीन झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे. नवीन उपक्रमांची सुरुवात आज नको.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा चांगला प्रभाव राहील. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आवर्जून प्रयत्न कराल. व्यवसायात अनेक आकर्षक संधी चालून येतील.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)
आज येणारी एकही संधी वाया घालवू नका. एखादी गुप्त बातमी समजेल गृहिणींनी झाकली मूठ ठेवणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

कन्या – (शुभ रंग – मोतीया)
कौटुंबिक अडचणी आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना वाव मिळेल.

तूळ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रातील पूर्वीच्या चुका निस्तरव्या लागतील. हातचे सोडून मृगजळामागे धावू नका. आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे फारच मनावर घेतील.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
उद्योगधंद्यातील महत्त्वपूर्ण करारमदार दुपारपूर्वी उरकून घ्या. नंतर दिवस तितकासा अनुकूल नाही संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क राहा. शेजाऱ्यांशी सलोखा राहील.

धनु – (शुभ रंग- भगवा)
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. वास्तू व वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

मकर – (शुभ रंग- डाळिंबी)
प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे व्हावी असा तुमचा अट्टाहास असेल. तरुणांनी मौजमजा करताना मर्यादांचे उल्लंघन करू नये. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे.

कुंभ – (शुभ रंग – क्रीम)
नोकरी-व्यवसायात व्यस्तता वाढेल. पारिवारिक सदस्यांच्या गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. गृहिणींना मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील.

मीन – (शुभ रंग – पिस्ता)
व्यावसायिक अडचणी कमी होतील. आधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. प्रिय मित्रांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.