Today’s Horoscope 09 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… शुक्रवार, दिनांक… 09 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ… चांगला दिवस
  • आज विशेष… कालाष्टमी. 
  • राहूकाळ..सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल….पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र… आद्रा 24.27 पर्यंत. नंतर पुनर्वसू.
  • आजची चंद्र राशी… वृषभ 11.44 पर्यंत नंतर मिथुन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमची आर्थिक बाजू उत्तम असेल. किरकोळ घर दुरुस्तीची कामे उद्भवतील. वाहनांचीही काळजी घ्यावी लागेल. आज मातोश्री तुमच्याच भल्यासाठी काही सल्ले देतील. ऐकून तर घ्या.


वृषभ – (शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. स्वप्नरंजन सोडून आज कृतीस प्राधान्य द्याल. शब्दांचा वापर जपून केलेला बरा.

मिथुन – (शुभ रंग – आकाशी)
आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत.

कर्क – (शुभ रंग – मरून)
आज काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. वादविवादात जरा नमतेच घेणे हिताचे. आज कमीच बोललेले बरे.

सिंह – (शुभ रंग – राखाडी)
नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील काही किचकट कामे आज सोपी होतील. सामाजिक कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. हाताखालच्या मंडळींत मिळून-मिसळून राहणे गरजेचे.

तूळ – (शुभ रंग – हिरवा)
कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारदरबारी रखडलेल्या कामांसाठी काही जुन्या ओळखी कामी येतील. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल


वृश्चिक
– (शुभ रंग – सोनेरी)
दिवस तितकासा अनुकूल नाही. नव्या उपक्रमांची सुरुवात आज नको. वैवाहिक जीवनातले क्षुल्लक मतभेद फार ताणू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून विषय संपवा.

धनु – (शुभ रंग – मोरपंखी)
आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यात जोडीने मिरवाल. आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.

मकर – (शुभ रंग – भगवा)
काही जुन्या प्रकृतीच्या तक्रारी डोके वर काढतील. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. परंतु आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.


कुंभ
– (शुभ रंग – चंदेरी)
कार्यक्षेत्रात नव्या संधी चालून येणार आहेत. केवळ चर्चेपेक्षा झटपट  निर्णय घेऊनच त्या संधींचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांना एखाद्या नव्या विषयात गोडी वाटेल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
उद्योगधंद्यात प्रगती रथ वेगवान राहील. तुम्ही योग्य वेळी घेतलेले अचूक निर्णय फायदेशीर ठरतील. कलाकारांची मात्र कामासाठी वणवण चालूच राहील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.