Today’s Horoscope 1 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – रविवार दि. 1 ऑगस्ट 2021  

  • शुभाशुभ विचार – 20 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – लोकमान्य टिळक पुण्यतिथी.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – भरणी 19.36 पर्यंत नंतर कृत्तिका.
  • चंद्र राशी – मेष.

—————————————

आजचे राशीभविष्य-

मेष – (शुभरंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःच्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. तरुणांच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. आती आक्रमकतेने निराशा पदरात पडेल. थोर मंडळींचे अनुभवाचे बोल ऐकून तरी घ्या.

मिथुन – (शुभ रंग- मरून)

पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले आज हसतमुख असतील.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही फारच हट्टीपणाने वागाल. अधिकाराचा गैरवापर महागात पडेल. कामात क्षुल्लक चुका करून विरोधकांना आयती संधी देऊ नका. सामंजस्याचे धोरण  हिताचे राहील.

सिंह – (शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. आज कोणतीही गोष्ट सहजसाध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्कीच मिळेल.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज कंटाळवाणा दिवस असून क्षुल्लक कामातही अडचणी येतील. मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. आज पत्नीच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका.

तूळ – (शुभ रंग – मोरपंखी)

व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. दुकानात गिर्‍हाईकांची वर्दळ वाढणार आहे. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील.

वृश्चिक – (शुभ रंग – क्रीम)

आज मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा एकाच्या भरवशावर दुसऱ्याला अजिबात शब्द देऊ नका, तो पाळता येणार नाही. विरोधक सक्रिय असताना कायद्याची चौकट अजिबात मोडू नका.

धनु – ( शुभ रंग – जांभळा)

कौटुंबिक वातावरण आज खेळीमेळीचे राहील. गृहिणी स्वतःसाठी आवर्जून वेळ काढतील. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधू शकतील. कलाकारांना रसिक मंडळी डोक्यावर घेतील.

मकर – ( शुभ रंग- केशरी)

आज गृहसौख्याचा दिवस आहे. दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. व्यवसायिकांची आर्थिक आवक पुरेशी राहील. आज प्रेम प्रकरणे मात्र फक्त मनस्तापच देतील.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

एखाद्या अनुकूल घटनेने आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. जवळपासच्या प्रवासाचे योग आहेत. काही नवीन ओळखी होतील. शेजाऱ्यांशी जवळीक निर्माण होईल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायिक उलाढाल वाढेल. आज मी म्हणेन तीच पूर्व असे तुमचे धोरण असेल. वादविवादात तुम्ही स्वतःचे घोडे पुढे दामटवाल. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424.
 ( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

                      

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.