Today’s Horoscope 1 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 1 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –
वार – बुधवार.
01.02.2023.
शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष- जया एकादशी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते  1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- मृग.
चंद्र राशी – वृषभ 13.59 पर्यंत नंतर मिथुन.
—————————————-

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा )

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. दूरचे प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे गती घेतील. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कर्क (शुभ रंग- जांभळा )

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने शुभच चिंता. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. आज काही दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतील.

सिंह (शुभ रंग- लाल )

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत श्रम गरजेचे आहेत. आज मित्रांच्या नादी लागू नका.

कन्या ( शुभ रंग- क्रीम )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे जाऊ नका. कायद्याची चौकट मोडू नका.

तूळ ( शुभ रंग- मोरपंखी )

आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी )

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा, सतर्क रहा.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नव्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )

आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील. नवोदित कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.

कुंभ (शुभ रंग – हिरवा )

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेम प्रकरणात नसती आफत होईल.

मीन -(शुभ रंग – भगवा )

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वणवण भटकावे लागणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. आज काम कमी व दगदग जास्त होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.