Today’s Horoscope 1 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 1 June 2023
वार – गुरूवार
01.06.2023
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष- प्रदोष.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा 6.48 पर्यंत नंतर स्वाती.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
सगळी कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही वैवाहिक जीवनात आज गोडी गुलाबी असणार आहे.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. तब्येत मात्र तुमची थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको.

मिथुन ( शुभ रंग- भगवा )
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य रोगावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल

 

कर्क (शुभ रंग- राखाडी )
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील. घर सजावटीस प्राधान्य द्याल.

सिंह (शुभ रंग- मरून )
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी )
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे आज अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. बुद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

तूळ ( शुभ रंग- क्रीम )
कार्यक्षेत्रात आज काही मनाजोगत्या घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. सहकाऱ्यांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

वृश्चिक (शुभ रंग- हिरवा) Today’s Horoscope 1 June 2023
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

धनु (शुभ रंग- आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. मोठा भाऊ आज योग्य सल्ले देईल.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेणार आहेत.

कुंभ (शुभ रंग – पांढरा )
कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरला तर तुमच्याच अडचणी वाढतील.

मीन (शुभ रंग – पिस्ता )
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. सामान्य दिवस.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pimpri : शहरात जोरदार गारपीटसह सोसाट्याचा वारा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.