Today’s Horoscope 10 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – मंगळवार दि. 10 ऑगस्ट 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस
  • आज विशेष – मंगळागौरी पूजन
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते  04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 09.53 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.
  • नक्षत्र पाया – चांदी
  • चंद्र राशी – सिंह

—————————————

आजचे राशीभविष्य. 

मेष – (शुभ रंग – मोतिया) 
नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. वाहन वास्तु विषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावणे गरजेचे.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. काही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कलाकारांना आज निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन – (शुभ रंग – केशरी) 
नोकरीच्या ठिकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. काही वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

कर्क – (शुभ रंग – हिरवा) 
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. आज आवडत्या व्यक्तीच्या सहवासात तुमची संध्याकाळ मजेत जाईल.

सिंह – (शुभ रंग – मरून)
आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या – (शुभ रंग – डाळिंबी)
आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्टचे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी) 
जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु – (शुभ रंग – जांभळा) 
हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – (शुभ रंग – गुलाबी)
विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

कुंभ – (शुभ रंग – मोरपिसी) 
घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होईल. आवक-जावक समांतर राहील.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी) 
अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडणार आहे. येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.