Today’s Horoscope 10 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 August 2022 
बुधवार.
10.08.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस. 
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाशाढा 09.40 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
चंद्र राशी – धनु – 14.58 पर्यंत नंतर मकर.

आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 10 August 2022

मेष – (शुभ रंग – राखाडी)

व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. आलेली कुठलीच संधी सोडू नका. प्रयत्नांना नशिबाची साथ नक्की मिळेल. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.


वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास लगाम घालणे राहील.


मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्वाच्या चर्चा वाटाघाटी दुपार पूर्वीच उरकून घ्याव्यात.


कर्क – (शुभ रंग – गुलाबी)

बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.


सिंह – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.


कन्या- (शुभ रंग- पिस्ता)

काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.


तुळ – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.


वृश्चिक- (शुभ रंग- जांभळा)

आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.


धनु – (शुभ रंग – मोरपिशी)

आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.


मकर – (शुभ रंग – मरून)

आज हाती पैसा राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड    पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडण्याची शक्यता आहे.


कुंभ- (शुभ रंग – नारिंगी)

आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.


मीन – (शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.


!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन – ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

Devendra Fadnavis: आता पाकव्याप्त काश्मीरही घेणार – देवेंद्र फडणवीस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.