Today’s Horoscope 10 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 December 2022
वार – शनिवार
10.12.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 17.42 पर्यंत नंतर पुनर्वसू.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-
मेष (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
खर्च कितीही वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती करावी लागेल.

वृषभ (शुभ रंग – निळा)
एखाद्या समारंभात आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. विवाह इच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. प्रिय व्यक्तीसह एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडणार आहे.

कर्क (शुभ रंग – सोनेरी)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कामानिमित्त दूरसे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

सिंह (शुभ रंग- लाल)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धातच लाभ संभवतो.

कन्या (शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. मित्रांना आज दुरूनच राम राम करावा.

तूळ (शुभ रंग – भगवा)
आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुम्ही बेत आखाल सज्जनांचा सहवास लाभणार आहे.

वृश्चिक (शुभ रंग – केसरी)
आज तुम्ही कोणावरच डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. सदैव सज्ज रहा.

धनु (शुभ रंग – आकाशी) – Today’s Horoscope 10 December 2022
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज मुलांचे वाढते हट्ट ही हौशीने पुरवाल. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची तुम्हाला खंबीर साथ राहील. छान दिवस.

मकर (शुभ रंग – केशरी)
आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. तुमची काही जुनी येणी असतील तर ती वसूल होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळी आज मौज मजेस प्राधान्य देतील. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात तुम्ही रमाल.

मीन (शुभ रंग – जांभळा)
आज काही घरगुती प्रश्न तुम्हाला लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.
.

श्री जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
संपर्क 9689165424

Chakan Accident News : राँग साईडने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.