Today’s Horoscope 10 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  बुधवार, ​दि​. 10 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – शिवरात्री.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा 14.12 पर्यंत नंतर श्रवण
  • चंद्र राशी –  मकर.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज उद्योगधंद्याच्या या दृष्टीने अत्यंत अनुकूल दिवस. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात आज करणे योग्य. विरोधक तुमच्या चुका शोधत आहेत. स्वावलंबनाने अनेक कामे सोपी होतील.

वृषभ – (शुभ रंग – )

नोकरीत वरिष्ठांना काही सुचवायचे असेल तर आज दिवस योग्य नाही. व्यवसायात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल.

मिथुन – (शुभ रंग –  )

नवीन झालेल्या ओळखित लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली  माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. जे चाललंय ते बरं चाललंय फार अपेक्षा नकोत.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. एखादे लग्न जुळवण्यासाठी आज तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)

आज काही अति हुशार मंडळी तुमच्या संपर्कात येतील. इतरांनी दिलेले सल्ले फक्त ऐकून घ्या आणि स्वतःच्या मनाचेच करा. आज तुम्हाला थोडा शारीरिक थकवा जाणवेल.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ रंग -पिस्ता)

गप्पं पेक्षा आज कृतीस प्राधान्य दिले तर कार्यक्षेत्रात वर्चस्व टिकून राहील. आज प्रकृती उत्तम साथ देईल. जुन्या मित्रांच्या सहवासात गतस्मृती ना उजाळा द्याल. आनंदी दिवस.

तूळ – (शुभ रंग – भगवा)

प्रॉपर्टी संबंधात काही व्यवहार अर्धवट राहिले असतील तर ते मार्गी लागतील. गृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबियांस पुरेसा वेळ देऊ शकाल. खेळाडूंनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोतिया)

व्यवसायात जाहिरातीवर खर्च करावा लागणार आहे. आपली काही जुनी तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतील. उत्पादनाचा दर्जाही वाढवणे गरजेचे आहे. तसेच कामाचे तासही वाढवावे लागतील.

धनु –  (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. हातात पैसा राहील. व्यापारी वर्गाची बाजारात पत वाढेल. येणाऱ्या उत्तम संधींचा फायदा घेणे तुमच्या हाती आहे.

मकर – ( शुभ रंग- राखाडी)

आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरची व्यक्ती कदाचित शेरास सव्वाशेर असू शकेल. आज जोडीदारास एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

कुंभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्हाला काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांचा शब्दास मान द्यावा लागेल.

मीन – (शुभ रंग – निळा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. महत्वाच्या वाटाघाटी किंवा विवाहविषयक चर्चेसाठी आजचा दिवस अतिउत्तम आहे. आज सज्जनांचा सहवास लाभणार आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.