Today’s Horoscope 10 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –   सोमवार . 10 मे  2021

  • शुभाशुभ विचार — वर्ज्य दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अश्विनी 20.25 पर्यंत नंतर भरणी.
  • चंद्र राशी –  मेष.

 

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

एखाद्या महत्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. वादविवादात आज आपल्याच मतावर अडून रहाल.

वृषभ –  (शुभ रंग- जांभळा)

काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

मिथुन – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कर्क – ( शुभ रंग -डाळिबी)

आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक  कामे सोपी होतील.

सिंह –( शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्या बऱ्या.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

आजचा दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल. मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.

 

धनु – ( शुभ रंग- क्रीम)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील.  उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी

मीन – ( शुभ रंग- मरून)

आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.