Today’s Horoscope 10 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार – मंगळवार, ​दि​. 10 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – 16 प. चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 07.56 पर्यंत नंतर पूर्वाफाल्गुनी..
  • चंद्र राशी – सिंह.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – पिस्ता)
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. घर खरेदी विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे आज तुमच्या जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अतिशय स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.

सिंह – (शुभ रंग – हिरवा)
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील.

कन्या  (शुभ रंग – भगवा)
आज काही अतिआवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. पासपोर्ट विजा विषयक कामे यशस्वी होतील.

तूळ  (शुभ रंग – नारिंगी)
नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.

धनु  (शुभ रंग – मोरपंखी)
वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

मकर  (शुभ रंग- आकाशी)
व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ  – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
आजचं स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये विशिष्ट संभवते सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी करा.

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.