Today’s Horoscope 10 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… शनिवार, दिनांक… 10 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ विचार…चांगला दिवस.
  • आज विशेष .. साधारण दिवस.                
  • राहूकाळ.. सकाळी 09.00 ते 10.30
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र.. पुनर्वसु
  • आजची चंद्र राशी…मिथुन 19.10 पर्यंत नंतर कर्क

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यक्षेत्रात आज काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. गृहिणींचा शेजारी सलोखा राहील. विद्यार्थ्यांना अभ्यास बोअर करेल.


वृषभ – ( शुभ रंग- मोतिया)

धंदेवाईक मंडळींची आर्थिक आवक चांगली राहील. नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्त्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मतावर ठाम रहाल. काही पाहुणे न मागता सल्ले देऊन जातील.

मिथुन – (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. तब्येत थोडी नरमच राहील विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. आज संयम ढळून देऊ नका.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवायला हवी. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालतील. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. घरातील वृद्धांची काळजी घ्या.

सिंह – (शुभ रंग – मरून)

उच्चशिक्षित असाल तर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून ध्येयाकडे यशस्वी वाटचाल होईल. संध्याकाळी मित्रांच्या सहवासात रमाल.

कन्या – (शुभ रंग -निळा)

कामाचा वाढता व्याप व अति महत्त्वाकांक्षा यामुळे काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ न देता आल्याने त्यांची नाराजी पत्करावी लागेल. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

आज व्यवसायाच्या दृष्टीने थोडा प्रतिकूल दिवस आहे. नव्या उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकललीत तर बर होईल. गृहिणींना आज भक्तीमार्गात गोडी वाटेल.


वृश्चिक
– (शुभ रंग -चंदेरी)

आज तुम्हाला काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या  लागणार आहेत. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. जे चाललंय ते बरं चाललंय. आज वाहन काळजीपूर्वक चालवा.

धनु – (शुभ रंग- भगवा )

आज मित्रांमध्ये न रमता आपल्या जोडीदाराला वेळ देणे गरजेचे राहील. अतिस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावू नका. आज तुम्ही दोघांच्या भांडणात यशस्वी मध्यस्थी करणार आहात.

मकर – (शुभ रंग- मोरपंखी )

अतिश्रमांचा तुमच्या तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज थोडी विश्रांतीची गरज भासेल. आज पत्नीस कशाला नाही म्हणू नका. दोघात आज तिसऱ्याला प्रवेश नको.


कुंभ
– (शुभ रंग- गुलाबी)

आज प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज तुम्ही मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

मीन – (शुभ रंग- सोनेरी )

पारिवारिक वातावरण आज अत्यंत खेळीमेळीचे असेल. मुले अगदी आज्ञाधारक पणे वागतील. गृहणी सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने भारावून जातील. आज तुम्ही मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.