रविवार, सप्टेंबर 25, 2022

Today’s Horoscope 11 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 August 2022

गुरूवार

11.08.2022

शुभाशुभ विचार – 11 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराशाढा 06.53 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.

—————————————-

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांच्या मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण कराल. नोकरदारांच्या बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा. अति आक्रमकतेने नुकसान होईल.

मिथुन- ( शुभ रंग- डाळिंबी)

आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

सिंह- ( शुभ रंग- गुलाबी )

काही आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला त्रस्त करतील. फार काळजी करू नका परंतु डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्या. कार्यक्षेत्रात गोड बोलणाऱ्या मंडळींपासून सावध राहा.

कन्या-( शुभ रंग पांढरा )

आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावासा वाटेल. प्रिय व्यक्तीचा सहवासात आज तुम्ही वेळेचे भान विसराल.

तूळ-( शुभ रंग- पिस्ता)

आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)

भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.

धनु- ( शुभ रंग- जांभळा)

रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर-( शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. दुरावलेली नाती जवळ येतील.

 

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

spot_img
Latest news
Related news