Today’s Horoscope 11 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 December 2022 
वार – रविवार
11.12.2022
शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- संकष्ट चतुर्थी.
राहू काळ – सकाळी 4.30 ते 6.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसू 20.36 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी – मिथुन 13.52 पर्यंत नंतर कर्क.
—————————————-
मेष (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. दुपारनंतर काही घरगुती समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
वाडीत गोडवा ठेवून आज तुम्ही अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल. सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात वादविवाद टाळा.

मिथुन (शुभ रंग- निळा)
महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर तुम्ही अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा, वाद टाळून सुसंवाद साधा.

Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 3 अधिकारी व 7 कर्मचारी निलंबित

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) – Today’s Horoscope 11 December 2022 
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनस्ताप देतील. दिवसाच्या उत्तरार्ध मात्र अनुकूल राहील.

सिंह (शुभ रंग – लाल)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. मोठे आर्थिक व्यवहार दुपार पूर्वी करा. आज प्रवासात पाकीट सांभाळा.

कन्या (शुभ रंग- पांढरा)
लोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. रिकामटेकडे गप्पांपेक्षा प्रत्यक्ष कृतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे.

तूळ (शुभ रंग- क्रीम)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील सतर्क रहा. आज अखंड नामस्मरणाने मनोबल वाढेल.

वृश्चिक (शुभ रंग- तांबडा)
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातून मनःशांती मिळेल.

धनु (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी शब्दांचा वापर कमीच करणेही तसेच राहील.

मकर (शुभ रंग – मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावेच लागतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अतिव्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – भगवा)
नवोदित कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली तरीही त्यांनी पथ्य पाणी सांभाळणे गरजेचे आहे अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटू शकतो.

मीन (शुभ रंग – आकाशी)
आनंदी व उत्साही असा दिवस असून सगळी कामे विना व्यत्यय पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या आज तुम्ही हौशीने पुरवाल.
.

श्री जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.