Today’s Horoscope 11 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… बुधवार  . ,….. ​दि​. 11 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –१९ नंतर चांगला.
  • आज विशेष — रमा एकादशी.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराफाल्गुनी.
  • चंद्र राशी – सिंह १२.०१ पर्यंत नंतर कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष( शुभ रंग –  डाळिंबी)

दिवस तितकासा अनुकूल असला तरीही आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडेल.

वृषभ( शुभ रंग – पिस्ता)

नोकरदारांना काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल. गृहिणी आज संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील

मिथुन  ( शुभ रंग- पांढरा)

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील

कर्क(शुभ रंग – राखाडी)

आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये

सिंह- (शुभ रंग- भगवा)

आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हितशत्रू सक्रिय असल्याने बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

_MPC_DIR_MPU_II

कन्या -( शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल.

तूळ  – ( शुभ रंग- केशरी)

ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. दूरच्या प्रवासात काही चांगल्या व्यक्तींशी हितसंबंध जुळून येतील.

वृश्चिक  ( शुभ रंग- नारंगी)

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.

धनु  – ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.

 

मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल.

कुंभ  – (शुभ रंग- आकाशी)

आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.

मीन  ( शुभ रंग- मोरपंखी)

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1