Today’s Horoscope 11 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग… रविवार, दिनांक… 11 ऑक्टोबर 2020

  • शुभाशुभ विचार…चांगला दिवस.
  • आज विशेष .. साधारण दिवस.                
  • राहूकाळ.. सायंकाळी 04.30 ते 06.00
  • दिशा शूल… पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र.. पुष्य.
  • आजची चंद्र राशी…कर्क

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोतिया)
आज कौटुंबिक स्तरावर घडणाऱ्या काही चांगल्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणे मात्र फक्त डोक्याला ताप देतील. खेळाडूंनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.


वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
आज काही नकारात्मक विचार मनात येथील काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनी राग अनावर होईल. स्वतःवर थोडा संयम ठेवा. जवळपासचे प्रवास फायदेशीर ठरतील.

मिथुन – (शुभ रंग – पांढरा)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा विरोध कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

कर्क – (शुभ रंग – भगवा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. तुमची सकारात्मकता समोरच्या व्यक्तीस प्रभावित करेल. आज एखादी चांगली बातमी कळेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

सिंह – (शुभ रंग – निळा)
काही क्षुल्लक दैनंदिन कामातही अडथळे येतील. काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. आज फक्त आपला स्वार्थ बघा. परमार्थ नंतर कधीतरी पाहता येईल.

कन्या – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीतून काही लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. येणाऱ्या संधींचा वेळीच फायदा घ्या.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. थोडी मानसिक बेचैनी राहील. महत्त्वाची कामे आज दुपार पूर्वीच उरकून घेतली तर बरे होईल.


वृश्चिक
– (शुभ रंग – गुलाबी)
आपले म्हणणे इतरांना पटलेच पाहिजे असा अट्टाहास करून चालणार नाही. नाती जपायची असतील तर खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणेच हिताचे राहील. आज काही सज्जनांचा सहवास लाभणार आहे.

धनु – (शुभ रंग – मोरपंखी)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे झटपट लाभाचा मोह नुकसानास कारणीभूत होईल. गृहिणींना घरात थोरांचे मानपान सांभाळावे लागतील. वाहनाच्या वेगावर आज नियंत्रण असावे.

मकर – (शुभ रंग – भगवा)
आज तुम्ही अगदी शांत डोक्याने जिभेवर साखर ठेवून घराबाहेर पडाल. भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. पत्नीशी एकमत राहील. अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील.


कुंभ
– (शुभ रंग – सोनेरी)
आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी असायला हवी. आज मातुल घराण्याकडून काही सुवार्ता येण्याची शक्यता आहे.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रातील नवीन ओळखी नव्या संधी घेऊन येतील. आज नवोदित लेखक व कवी यांना प्रसिद्धी मिळेल. अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस सत्कारणी लावाल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.