Today’s Horoscope 12 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – शुक्रवार 12 मार्च 2021

  • शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – शततारका 22.51 पर्यंत नंतर पूर्वा भद्रपदा.
  • चंद्र राशी –  कुंभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)

प्रकृतीस्वास्थ्य चांगले असल्याने तुमचा कामातील उत्साह वाढेल. उद्योग-धंद्यात मनाजोगती धनप्राप्ती होईल. नवे हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून )

कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील सतर्क राहा. आपला स्वार्थ बघा.

मिथुन – (शुभ रंग – गुलाबी)

नवीन व्यावसायिकांनी धंद्यात मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक धाडस करू नये. ज्येष्ठ मंडळींनी जवळ असलेली पुंजी जपून वापरणे गरजेचे आहे. गृहिणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

कर्क –  (शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी मौजमजा करताना आपल्या मर्यादित राहावे. चुकीच्या वर्तनाने मानहानी होऊ शकते. क्षणिक मोह टाळणे हिताचे. ड्रायव्हिंग करताना जरा जपून.

सिंह- (शुभ रंग- चंदेरी)

आज काही महत्त्वपूर्ण बातम्या कानी येणार आहेत. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची साथ मोलाची राहील. आज तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. तरीही हातचे राखूनच बोला.

कन्या – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी आज तुम्हाला हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतात. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका

तूळ – (शुभ रंग – लेमन)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल. आज बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- गुलाबी)

रिकामटेकड्या गप्पां पेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणी हसतमुख असतील. स्थावर विषयक कामे गती घेतील.

.

धनु – (शुभ रंग -निळा)

आज काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध तयार होतील, व ते भविष्यकाळात व्यवसायाच्या  दृष्टीने फायदेशीर ठरतील.

मकर – (शुभरंग- पिस्ता)

काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील. अति स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

कुंभ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुमची तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभही होणार आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जे मनी योजाल ते तडीस न्याल.

मीन – (शुभ रंग- पांढरा)

कामधंद्याच्या ठिकाणी आज काही किचकट प्रसंग कौशल्याने हाताळाल. गृहिणींनी गप्पांतून गैरसमज वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आज खर्च करावाच लागेल  बचतीचा विचार सोडून द्या.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.