Todays Horoscope 12 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरुवार, दि. 12.05.2022 (Todays Horoscope 12 May 2022)

  • शुभाशुभ विचार – 07 पर्यंत चांगला.
  • आज विशेष – मोहिनी एकादशी.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तरा 19.30 पर्यंत नंतर हस्त.
  • चंद्र राशी – कन्या.

—————————————

आजचे राशीभविष्य (Todays Horoscope 12 May 2022)

मेष – ( शुभ रंग – लाल)

कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच  लपलेला असू शकतो सावध राहा. आज तुमची काही येणी असतील तर वसूल होतील.

वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )

काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतिनेही तुम्ही भारावून जाल. आज तुमचा मौज-मजा करण्याकडे कल राहील. मोहाचे प्रसंग येतील.

मिथुन -( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. आज ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.

कर्क – ( शुभ रंग मरून)

आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल.  काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह द्विगुणित होईल. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर राहाल. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा ) 

आज आर्थिक सुबत्ता येईल. विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

तूळ – (शुभ रंग डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. दूरचे प्रवास कार्यसाधक ठरतील. मनाच्या लहरीपणास आवर घाला.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आज संध्याकाळ मजेत जाईल. अनुकूल घटना आत्मविश्वास वाढवतील.

धनु – ( शुभ रंग – निळा )

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील

मकर –  (शुभ रंग – मोरपंखी )

आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग गुलाबी )

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज दमत असशील ना खूप, असे म्हटल्याने बरेचसे प्रश्न सुटतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार )

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.