Today’s Horoscope 12 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार… गुरुवार   . ,….. ​दि​. 12 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –शुभ दिवस.
  • आज विशेष — वसुबारस.
  • राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त.
  • चंद्र राशी – कन्या

 

आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग- राखाडी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. वैवाहिक जोडीदाराकडून आज फार अपेक्षा नकोत.

वृषभ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.

मिथुन ( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. आईचे मन मात्र आज दुखावू नका.

कर्क( शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही न मागता सल्ला देऊ नका.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – ( शुभ – रंग भगवा)

आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी द्विधा मनस्थिती होणार आहे. एखाद्या चालू उपक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे.

तूळ  – (शुभ रंग- नारिंगी)

आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा आहे बिनधास्त खर्च करा. आज बचतीचा विचारच नको.

वृश्चिक ( शुभ रंग  केशरी)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह जुळवणी विषयी  बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य आहे. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.

धनु  – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

 

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता नातवंडाबरोबर रमावे.

कुंभ  – (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन ( शुभ रंग -आकाशी)

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. नोकरीसाठी दिलेले इंटरव्ह्यू यशस्वी होतील.
!! शुभं भवतु!!

 

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1