Today’s Horoscope 12 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार….सोमवार. दिनांक…12.10.2020

  • शुभाशुभ विचार… 17 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष .. साधारण दिवस.                
  • राहूकाळ.. सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल… पूर्वेस असेल.
  • नक्षत्र.. आश्लेषा
  • आजची चंद्र राशी.. कर्क.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग -सोनेरी )

आज स्थावराची खरेदी विक्री नफा मिळवून देईल. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधतील.


वृषभ – (शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला काही कौटुंबिक अडचणी चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तास वाढवावे लागतील.

मिथुन – (शुभ रंग -हिरवा )

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वासाने नव्या योजना हाती घ्याल. कार्यक्षेत्रातील स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. आज गरजवंताला मदत कराल.

कर्क – (शुभ रंग – केशरी  )

हट्टीपणास लगाम घालून आज इतरांचेही विचार ऐकून घ्या. कार्यक्षेत्रात सावधपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. आज विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

सिंह – (शुभ रंग – डाळिंबी )

आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. गृहिणींचा आज देवधर्माकडे व दान धर्माकडे ओढा राहील. दूरचे प्रवास करत असाल तर प्रवासात रात्री झोपू नका. सतर्क रहा.

कन्या – (शुभ रंग- निळा )

बरेच दिवसापासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. काही जणांना नव्या घराचा ताबा मिळेल. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते. आज इच्छापूर्तीचा दिवस.

तूळ – (शुभ रंग- आकाशी )

अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत. आज मित्रमंडळींबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे. आज केलेल्या कष्टांचे फळ उद्याच मिळेल


वृश्चिक
 – (शुभ रंग- चंदेरी )

घरात आज काही क्षुल्लक कारणाने वडिलधार्‍यांशी मतभेद होतील. आज नास्तिक सुद्धा गरजेपुरते अध्यात्मिक होतील. श्रद्धाळू भाविकांना एखादी प्रचिती नक्की येईल.

धनु – (शुभ रंग- गुलाबी )

आज काही मनाविरुद्ध घटना घडतील. हातचे सोडून पळत्यामागे धावू नका, जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. व्यवसायात आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको.

मकर – (शुभ रंग- जांभळा )

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरदारांना बाढतीचा मार्ग सोपा होईल. आज वैवाहिक जीवनात तू तिथे मी असे वातावरण राहील.


कुंभ
– (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

वरिष्ठ आज गोड बोलून तुम्हाला राबवून घेतील. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराचे मन समजून घ्या. कुठून येणी असतील तर मागायला लाजू नका.

मीन – ( शुभ रंग -मोरपिशी )

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज तुम्हाला वेळेचे भान राहणार नाही. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.