Today’s Horoscope 12 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार -रविवार, दि. 12 सप्टेंबर 2021

शुभाशुभ विचार- 12 नंतर चांगला.

आज विशेष – गौरी आवाहन.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – विशाखा 9.50 पर्यंत नंतर अनुराधा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————

आजचे राशीभविष्य.

मेष – ( शुभ रंग मोरपिशी)

आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. सतत कामामुळे दिवस कंटाळवाणा जाईल. अनोळखी व्यक्तींवर चुकूनही विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ – ( शुभ रंग जांभळा )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज संध्याकाळी लवकर घर गाठा. जोडीदारास दिलेली वचने पाळावी लागणार आहेत.

मिथुन– ( शुभरंग- मरून )

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी आज जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज टाळा. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. आपल्या पिताश्रींनी दिलेले सल्ले योग्यच असतील.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.