Today’s Horoscope 13 April  2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 13 April  2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 13.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 9.00  ते  10.30.

दिशा शूल – पूर्वेला असेल.

आज नक्षत्र – मृग. 

चंद्र राशी – वृषभ 12.44 पर्यंत नंतर मिथुन.

—————————–

मेष  ( शुभ रंग- राखाडी)

आज भावनेच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येणार आहेत. एखाद्या समारंभात आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया)

आज दिवसच खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही करू नका. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी होईल. गरजूंना आज तुम्ही सढळ हस्ते मदत कराल.

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ होईल.

कर्क ( शुभ रंग- क्रीम) 

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे आज अवघड जाईल.

सिंह ( शुभ रंग- मोरपिशी)

आज देवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडिलांच्या तब्येतीची चौकशी करा.

कन्या (शुभ रंग- आकाशी)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध असा.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा) 

प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

धनु (शुभ रंग- भगवा)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मकर (शुभ रंग- पिस्ता)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा. आईच्या आज्ञा पाळा.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

मीन (शुभ रंग- पांढरा)

खर्च वाढला असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होणार आहेत. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.