Today’s Horoscope 13 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 December 2022 
वार – मंगळवार.
13.12.2022.
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
—————————————-
मेष (शुभ रंग- राखाडी)
नोकरदारांना आज कामावर दांडी मारावीशी वाटेल. आज मुलांची अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल. वास्तु खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकारांना चहाते डोक्यावर घेतील. गृहिणी शेजार धर्म जपतील.

मिथुन (शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही चांगला प्रभाव पडेल. व्यवसायात आवक मनाजोगती राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल.

कर्क (शुभ रंग- निळा)
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. आज अतिस्पष्ट बोलून कोणाच्या भावना दुखावू नका.

सिंह (शुभ रंग- पिस्ता)
काहींना तातडीचे दूरचे प्रवास घडतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा आहे.

कन्या (शुभ रंग- चंदेरी)
व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकियात तुमच्या शब्दास किंमत राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

तूळ (शुभ रंग- क्रीम)
आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांच्या फार नादी लागू नका.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असून नोकरीतही वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. नास्तिक ही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.

धनु (शुभ रंग- भगवा)
आज धाडसाची कामे टाळावीत. झटपट लाभाचा मोह तर नकोच. विवाहविषयक बोलणी आज करू नका. जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

मकर (शुभ रंग – मोरपंखी)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावाखाली राहील. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)
नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहनभूतीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

मीन (शुभ रंग – आकाशी) – Today’s Horoscope 13 December 2022 
तरुण वर्गाचा आज मौज-मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधाकट राहील.

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
संपर्क 9689165424

Talegaon Dabhade : साडेतीन तास कुडकुडत केले जलसमाधी आंदोलन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.