Today’s Horoscope 13 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  शनिवार, ​दि​. 13 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – शततारका  15.11 पर्यंत. नंतर पूर्वा भाद्रपदा.
  • चंद्र राशी –  कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)

प्रकृतीस्वास्थ्य चांगले असल्याने तुमचा कामातील उत्साह वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित लाभ होतील. तुम्ही व्यावसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

वृषभ – (शुभ रंग – मरून )

आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होईल. कार्यक्षेत्रात सावधपणे निर्णय घ्याल. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडाल. अधिकार वापरताना कर्तव्याची ही जाण असू द्या.

मिथुन – (शुभ रंग – गुलाबी)

कामाच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. मानसिक संतुलन दळून देऊ नका. ज्येष्ठ मंडळींनी जवळ असलेली पुंजी जपून वापरणे गरजेचे आहे. आज भक्तिमार्गात रमाल.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

व्यावसायिक महत्त्वाचे करार किंवा विवाहविषयक बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतीही रिस्क नको. क्षणिक मोह टाळणे हिताचे. ड्रायव्हिंग करताना जरा जपून.

सिंह – (शुभ रंग- चंदेरी)

आज काही महत्त्वपूर्ण बातम्या कानी येणार आहेत. व्यावसायिकांचे महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. दुकानदारांकडे ग्राहकांची चांगली वर्दळ राहील.

कन्या – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी आज तुम्हाला हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतात. नोकरदार प्रामाणिकपणे काम करतील.

तूळ – (शुभ रंग – लेमन)

आज तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

वृश्चिक – ( शुभ रंग- गुलाबी)

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना आज चालना मिळेल. नवे परिचय होतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणी हसतमुख असतील.

धनु – (शुभ रंग -निळा)

आज काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिटू शकतील. नव्या ओळखीतून व्यवसाय वृद्धी होईल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क असावे.

मकर –  (शुभरंग- पिस्ता)

आज खिशात पैसा खेळता राहील. कुटुंबीयांचे वाढते हौशीने पुरवाल. आज शब्द मात्र जपून वापरायला हवेत. अति स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. मागितल्याशिवाय कुणाला सल्ले देऊ नका.

कुंभ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुमची तब्येत ठणठणीत राहील. नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. जे मनी योजाल ते तडीस न्याल. दूरच्या प्रवासात मात्र खोळंबा होईल.

मीन – (शुभ रंग- पांढरा)

कामधंद्याच्या ठिकाणी आज काही किचकट प्रसंग कौशल्याने हताळाल.  मित्र आज दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. हाती असलेला पैसा जपून वापरा.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.