Today’s Horoscope 13 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

0

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  बुधवार. …. ​दि​.  13 जानेवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
  • आज विशेष – धनुर्मास समाप्ती.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – धनु १२.०६ पर्यंत, नंतर मकर.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांच्या मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण कराल. नोकरदारांच्या बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा.

मिथुन – ( शुभ रंग- डाळिंबी)
आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

सिंह – ( शुभ रंग- गुलाबी )
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आज ताकही फुंकून पिणे गरजेचे आहे.

कन्या- ( शुभ रंग पांढरा )
तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळींना मेहनतीचे फळ मिळेल.

तुळ – ( शुभ रंग- पिस्ता)
आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)
भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल. महत्त्वाचे मेल्स येतील.

धनु-  ( शुभ रंग- जांभळा)
रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर – ( शुभ रंग- नारिंगी)
आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)
अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन- ( शुभ रंग- चंदेरी)
उच्चशिक्षित असाल तर मोठ्या पॅकेजच्या नोकरांचे प्रस्ताव येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी आपल्या स्वार्थासाठी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.