Today’s Horoscope 13 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – रविवार, 13 जून  2021

 

  • शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
  • आज विशेष — सामान्य दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुनर्वसु 18.01 पर्यंत नंतर पुष्य
  • चंद्र राशी – मिथुन दुपारी 12.32 पर्यंत नंतर कर्क.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. कलाकारांना कामासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

वृषभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. त्यानंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल.

मिथुन – ( शुभरंग- तांबडा )

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे  समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी )

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल.

मकर – ( शुभ रंग- लाल)

काही अप्रिय माणसे संपर्कात येतील, न मागता सल्लेही देतील ऐकावे जनाचे करावे मनाचे हे धोरण योग्य. प्रेम प्रकरणांना घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. आज काही गोड बोली माणसे भेटतील परंतु गाफील राहू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल. आज मुले आज्ञाधारक पणे वागतील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागारToday’s Horoscope 10 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.