_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Today’s Horoscope 13 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – गुरुवार. 13 मे  2021

  • शुभाशुभ विचार — शुभ दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र — रोहिणी.
  • चंद्र राशी –  वृषभ.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील.

.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा, मोफत सल्ले वाटप नको.

मिथुन – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा  विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

 

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

मकर – (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटण्याजोगी कामगिरी कराल.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. टेलिफोन बिल भरावे लागणार आहे. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.