Todays Horoscope 13 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 13.05.2022

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – हस्त 18.48 पर्यंत नंतर चित्रा.
  • चंद्र राशी – कन्या.

————————————
मेष – (शुभ रंग- राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असल्याने आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. काही मोफत सल्लागार माणसे उगीच डोक्याला ताप देतील.

वृषभ – (शुभ रंग- मरून)

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. आज तुम्ही जरा मौजमजेस प्राधान्य द्याल.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा)

कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत. काही महत्त्वाच्या बातम्या समजतील. गृहिणीनी झाकली मूठ झाकून ठेवणे हिताचे.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे.

तुळ – (शुभ रंग – मोतिया)

पैसा येणे इतकेच पैसा जाण्याचे ही मार्ग प्रशस्त असतील. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक दूरच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग- सोनेरी)

उद्योग व्यवसायात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. मित्र-मैत्रिणी तुमचा शब्द झेलतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

धनु – (शुभ रंग -आकाशी)

नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील. योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी कामी येतील. आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – (शुभ रंग- निळा)

दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर मागितल्यावर वसूल होतील.

कुंभ – (शुभ रंग – लाल)

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

मीन – (शुभ रंग – क्रीम)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. संध्याकाळी सत्संगात रमाल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन  – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.