Todays Horoscope 13 October 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 13.10.2021

  • शुभाशुभ विचार – 9 नंतर. चांगला दिवस.
  • आज विशेष – महाष्टमी उपवास.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 10.19 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – धनु दुपारी 16.06 पर्यंत नंतर मकर.

—————————————

आजचे राशीभविष्य – 

मेष – (शुभ रंग – राखाडी )

व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. आलेली कुठलीच संधी सोडू नका. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.

वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास लगाम देणे हिताचे राहील.

मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

आत्मविश्‍वास व मनोबलात वृद्धी होईल महत्त्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर केलेले बरे. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.

सिंह -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.

कन्या- ( शुभ रंग- पिस्ता)

काही नव्या ओळखी होतील  तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.

वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)

आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.

धनु – (शुभ रंग – मोरपिशी)

आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.

मकर- ( शुभ रंग – मरून)

आज हाती पैसा खेळता राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड    पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.

कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी)

आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.