Today’s Horoscope 13 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, रविवार, दिनांक…13 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…चांगला दिवस.
  • आज विशेष .. इंदिरा एकादशी.
  • राहूकाळ…सकाळी 04.30 ते 06.00
  • दिशा शूल…पश्चिमेस असेल.
  • नक्षत्र… पुनर्वसु 16.34 पर्यंत नंतर पुष्य.
  • आजची चंद्र राशी… मिथुन 10.36 पर्यंत नंतर कर्क.

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – मरून)

आज काही रेंगाळलेल्या घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. गृहिणींचे गृहोद्योग तेजीत चालणार आहेत दिवसभरात एखादी सुवार्ता कानी येईल.


वृषभ(शुभ रंग – गुलाबी)

आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असून तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. साहित्यिक मंडळींकडून उत्तम लिखाण होईल.

 

मिथुन(शुभ रंग – हिरवा)

सभा संमेलनात आज तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. काही प्रिय पाहुण्यांची घरी उठबस राहील. नाती सांभाळायची असतील तर खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे गरजेचे आहे.

 

कर्क(शुभ रंग – मोरपंखी)

कंजुषपणा  सोडून आज काही अत्यावश्यक कारणांसाठी खर्च करावाच लागणार आहे. देण्यघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. दूरचे नातलग संपर्कात येतील. आज हरवलेले गवसेल.

 

सिंह(शुभ रंग – जांभळा)

कर्तव्य बाजूस ठेऊन आज मौजमजा करण्यास प्राधान्य द्याल. आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघडच जाईल.

 

कन्या(शुभ रंग – पांढरा)

आज तुम्ही सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील. उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या चालून येतील.

 

तूळ(शुभ रंग – निळा)

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा, त्यानंतर थोडीफार मानसिक अस्वस्थता राहील. आज जिवलग मित्रांमध्येही काही मतभेद होण्याची शक्यता आहे.

 

वृश्चिक(शुभ रंग – आकाशी)

नोकरीत काही कंटाळवाणी कामे करावे लागतील. वरिष्ठ आज तुम्हाला गोड बोलून राबवून घेणार आहेत. आज भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल.

धनु(शुभ रंग – सोनेरी)

 व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे. कोणतीही धाडसाची कामे टाळा. प्रतिष्ठेस जपा.

 

मकर(शुभ रंग – चंदेरी)

नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराच्या चुका काढू नका.

 

कुंभ(शुभ रंग – राखाडी)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे हिताचे. दुकानदारांची उधारी वसूल होईल.

 

मीन(शुभ रंग – डाळिंबी)

तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचा आलेख चढताच राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळेल.

 

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.