Today’s Horoscope 13 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

13.09.2023.

शुभाशुभ विचार- चतुर्दशी वर्ज्य.

आज विशेष- शिवरात्री.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30. 

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा 26.01. पर्यंत नंतर पूर्व फाल्गुनी.

चंद्र राशी- सिंह.

————————————

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही मौजमजेस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त खर्च कराल. कलाकारांना आज विविध संधी चालून येतील.

वृषभ (शुभ रंग- मोरपंखी )

कौटुंबिक सदस्यांमध्ये सुसंवाद असेल. मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे.

मिथुन ( शुभ रंग- जांभळा )

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या.

कर्क (शुभ रंग-राखाडी)

उद्योग व्यवसायात मिळकत उत्तम असल्याने आज तुमचे मनोबलही उत्तमच असेल. कार्यक्षेत्रात प्रभावी नेतृत्व कराल. तुमचा उत्साह पाहून विरोधकांनाही तुमचा हवा वाटेल.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

जिथे जाल तिथे तुम्ही आज आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई न करता इतरांचेही विचार ऐकून घ्या. कायद्याची चौकट मोडू नका.

कन्या ( शुभ रंग- केशरी)

हाती असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा असा मोठा खर्च उद्भवू शकेल की जो टाळता येणार नाही. काहीजण सहकुटुंब दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

तूळ ( शुभ रंग- क्रीम)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस अति उत्तम आहे.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)

भावनेपेक्षा कर्तव्यासच प्राधान्य देणे आज योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढणार आहे. किरकोळ तब्येतीच्या तक्रारी ही दुर्लक्षित करू नका.

धनु- (शुभ रंग- गुलाबी)

कोणतीही गोष्ट आज सहज मिळाली नाही तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्कीच लाभेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. वडीलधाऱ्यांना मात्र आज दुखावू नका.

मकर ( शुभ रंग- चंदेरी )

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे आज संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळायला हवा. आज कोणतेही धाडस नको नाकासमोर चाला.

कुंभ (शुभ रंग – निळा)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज जोडिदाराला अभिमानास्पद वाटण्यासारखी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

मीन -(शुभ रंग – पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या तब्येत थोडी नरमच राहील.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.