Today’s Horoscope 14 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार –  रविवार, ​दि​. 14 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
  • दिशा शूल- पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 16.33 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.
  • चंद्र राशी – मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- मरून)

आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा बराच वेळ फुकट जाईल. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्या पूर्वी विचार करा. गृहिणींनी झाकली मूठ झाकली ठेवावी.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या राशीच्या लाभातून चंद्र भ्रमण सुरू आहे. तुमची अपुरी स्वप्ने साकार होतील.  छान दिवस

मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)

उद्योग-व्यवसायात प्रगती रथ वेगवान राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

कर्क – (शुभरंग- पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. नोकरीच्या ठिकाणी काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह – ( शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे.  नीतीबाह्य  वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. आज कोणतीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. एखादा विवाह जुळवण्यासाठी तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. पत्नीला दिलेली वचने पळाल.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)

बेरोजगारांची वणवण संपून त्यांना मनासारखा रोजगार मिळेल. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. जीवलग मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होतील. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा

वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)

 बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. गर्भवतींना सुदृढ संततीचा लाभ होईल. आज मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ मिळेल. काही मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात आज इतरांचे लक्ष वेधून घ्याल.

मकर – ( शुभ रंग- निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पायपीट होईल.

कुंभ – ( शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग- जांभळा)

आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. आज तुम्हाला थोडी संयमाची गरज असून अतिउत्साहाच्या भरात घेतलेले तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांनी आज पालकांच्या आज्ञेबाहेर अजिबात जाऊ नये.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.