-MPC-TOP-MOST-BANNER-I

Today’s Horoscope 14 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – सोमवार, 14 जून  2021

  • शुभाशुभ विचार – 10 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – विनायक चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुष्य 20.36 पर्यंत नंतर आश्लेषा.
  • नक्षत्र पाया- चांदी
  • चंद्र राशी – कर्क.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

शैक्षणिक क्षेत्राशी  संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज विलासी वृत्ती बळावेल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील.  अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. मातोश्रींच्या हो ला हो करून विषय संपवा.

मिथुन – ( शुभ- रंग क्रीम)

सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, पण तुम्ही लक्ष देऊ नका.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.

तूळ – ( शुभ रंग- आकाशी )

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – पांढरा)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – ( शुभ रंग – केशरी)

आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात व्यतीत कराल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागारToday’s Horoscope 10 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn