Todays Horoscope 14 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 14.05.2022

  • शुभाशुभ विचार – 13 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – श्रीनृसिंह जयंती.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा 17.28 पर्यंत नंतर स्वाती.
  • चंद्र राशी – सकाळी 6.13 पर्यंत कन्या नंतर तुळ.

————————————

आजचे राशीभविष्य–

मेष – धंद्यातील आवक-जावक समान राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. कार्यक्षेत्रात समोर येणारी नवीन आव्हाने आनंदाने स्वीकाराल. मित्र दिलेला शब्द पाळतील.

वृषभ – ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. हाताखालच्या लोकांचीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी )

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज संध्याकाळी सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आस्वाद घ्याल.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काही तरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. महिलांना जोडधंद्यातून चांगली कमाई होईल. आईचे मन दुखवू नका.

सिंह – (शुभ रंग – पांढरा )

अथक परिश्रम यांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील.  नवीन झालेल्या ओळखीत स्वतःचे हित साधून घ्याल. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास प्राधान्य देतील.

कन्या- ( शुभ रंग- जांभळा )

मिळकत पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे हिताचे राहील. गृहिणी आज सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील. अनपेक्षित लाभ संभवतात.

तूळ- ( शुभ रंग – पिस्ता )

घराबाहेर वावरताना आपला रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुणी शेरास सव्वाशेर भेटू शकतो. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक आधी तपासा.

वृश्चिक- ( शुभ रंग- भगवा )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी उद्यावर ढकला.

धनु – ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील विवाहेच्छुकांना अनुरूप स्थळांचे प्रस्ताव येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होऊ शकतो.

मकर – (शुभ रंग- आकाशी )

हाऊस मौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड चुकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेस जपा. आज कायद्यात राहिलात तरच फायद्यात राहाल.

कुंभ (शुभ रंग -केशरी )

आज काही अयोग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल.

मीन – ( शुभ रंग तांबडा )

आज शुल्लक कारणाने चिडचिड होईल. महत्त्वाचे व्यावसायिक करार उद्यावर ढकलले बरे. आज प्रेमप्रकरणे मनस्ताप देतील. जोडीदाराकडूनही फार अपेक्षा नकोत.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.