Today’s Horoscope 14 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार….बुधवार. दिनांक…14.10.2020

  • शुभाशुभ विचार –12 पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – प्रदोष.
  • राहू काळ – दुपारी 12.00  ते 1.30
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वा 20.41 पर्यंत नंतर उत्तरा.
  • चंद्र राशी – सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग -मोतिया)

व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील.  स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमची तब्येत उत्तम असेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृषभ – (शुभ रंग -सोनेरी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. जागेविषयी प्रश्न सुटतील.

मिथुन – (शुभ रंग -केशरी)

कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर वाटेल.

कर्क – (शुभ रंग- हिरवा)

वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.

सिंह – (शुभ रंग- मरून)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अतिस्पष्टवक्तेपणाने काही नाती दुरावतील.

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )

आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.


वृश्चिक
 – (शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील. घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.

मकर – (शुभ रंग गुलाबी)

आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज धाडसाची कामे टाळलेली बरी.


कुंभ
– (शुभ रंग – मोरपिशी)

आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.