Today’s Horoscope 14 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, सोमवार, दिनांक…14 सप्टेंबर 2020

  •  शुभाशुभ…उत्तम दिवस.
  • आज विशेष .. द्वादशी श्राद्ध.
  • राहूकाळ…सकाळी 07.30 ते 09.00
  • दिशा शूल…पूर्वेस असेल.
  • नक्षत्र… पुष्य 15.52 पर्यंत नंतर आश्लेषा
  • आजची चंद्र राशी… कर्क

आजचे राशीभविष्य

मेष(शुभ रंग – गुलाबी)

आज दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. मुलांच्या अभ्यासात ही थोडे लक्ष घालणे गरजेचे आहे. कलाकारांचे स्ट्रगल चालूच राहील.


वृषभ(शुभ रंग – मोरपिशी)

नोकरी-व्यवसायात थोडीफार अस्थिरता जाणवेल तुमचे मनोबल ही कमीच राहील. आज तुम्हाला हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल पण तसे करू नका.

 

मिथुन(शुभ रंग – मरून)

प्रियजनांचा सहवास लाभेल. आज तुम्ही इतरांना काही महत्त्वपूर्ण सल्ले द्याल. अती स्पष्टवक्तेपणाने कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

 

कर्क(शुभ रंग – हिरवा)

मानसिक प्रसन्नता राहील. आज तुम्ही एखाद्या किचकट कामातही जिद्दीने कार्यरत रहाल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीनेही हळवे व्हाल. एखाद्या गरजूस आवर्जून मदत कराल.

 

सिंह(शुभ रंग – पांढरा)

आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. गरजूंना सढळ हस्ते मदत कराल. विरोधकांच्या कारवाया चालूच राहणार आहेत सतर्क राहा.

 

कन्या(शुभ रंग – जांभळा)

नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. वाहन किंवा वास्तू खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल.

 

तूळ – (शुभ रंग – आकाशी)

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात. अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत. नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल.

 

वृश्चिक(शुभ रंग – निळा)

घरात आज काही कारणाने वडिलधार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वयाचा मान राखणे हिताचे राहील. कायद्याची चौकट मोडण्याचा प्रयत्न करू नका.

 

धनु(शुभ रंग – सोनेरी)

आज धाडसाची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करावे. तरुणांनी वाहन चालवताना स्टाईल मारू नये. आज सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

 

मकर(शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही अत्यंत उत्साही व ताजेतवाने असाल. कार्यक्षेत्रात एखाद्या नव्याने येणाऱ्या संधीचे तुम्ही सोने कराल. वैवाहिक जीवनात सामंजस्याची भावना राहील.

 

कुंभ(शुभ रंग – राखाडी)

व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घेणे गरजेचे राहील. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची भक्कम साथ राहील. आशादायी दिवस.

 

मीन(शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू राहील. वेळीच घेतलेले अचूक निर्णय फायदेशीर ठरतील. प्रतिष्ठित मंडळींच्या ओळखीचा आपल्या हितासाठी उपयोग करून घ्याल.

 

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.