Today’s Horoscope 14 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – बुधवार, 14 सप्टेंबर 2021.
  • शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
  • आज विशेष – गौरी विसर्जन
  • राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 07.05 पर्यंत नंतर मूळ
  • चंद्र राशी – वृश्चिक 07.05 पर्यंत नंतर धनु.
—————————————
आजचे राशीभविष्य –
मेष- (शुभ रंग- निळा)
घरात वडीलधारी मंडळी स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल. सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.
वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. प्रतिष्ठेची काळजी घ्या. कष्टाने यश साध्य होईल.
मिथुन -(शुभ रंग- हिरवा)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील आशादायी दिवस.
कर्क – ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे.
सिंह- ( शुभ रंग – लाल)
नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल भाग्यवान महिला आज मौल्यवान खरेदी करतील. चालू नोकरीत बदल करायचा असेल तर संधी चालून येतील.
कन्या- ( शुभ रंग- मोतिया )
आज प्रॉपर्टी विषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल, सांभाळा. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.
तुळ – ( शुभरंग -स्ट्रॉबेरी)
दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे.
वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल शक्यतो टाळा.
धनु -(शुभ रंग – भगवा )
अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील.
विरोधकही आज नमते घेतील.
मकर – (शुभ रंग- जांभळा)
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट, विजा विषयक कामे यशस्वी होतील.
कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी )
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.
मीन – ( शुभ रंग – मरून)
यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
!! शुभम भवतु!!
जयंत कुलकर्णी.
फोन- 9689165424.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.