Today’s Horoscope 15 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार – गुरुवार. 15 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — गौरी तृतीया ( तीज).
  • राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – कृतिका 20.32 पर्यंत नंतर रोहिणी.
  • चंद्र राशी –  वृषभ.

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- आकाशी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आज गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. आनंदी दिवस.

वृषभ –( शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे.

मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )

आज तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही चांगलाच प्रभाव पडेल.

कर्क –  ( शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जाही वाढवावा लागणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल.

सिंह – (शुभ रंग – डाळिंबी)

नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.

_MPC_DIR_MPU_II

कन्या –  (शुभ रंग- सोनेरी)

शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संनाने  मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.

वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.

धनु –( शुभ रंग- भगवा)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.

मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

मीन  – ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. महत्वाची मेल्स येतील. मित्रांच्या मंगल कार्यास हजेरी लावाल.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.