Today’s Horoscope 15 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 15 December 2022 
वार – गुरुवार.
15.12.2022.
शुभाशुभ विचार- 13 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
—————————————-
मेष (शुभ रंग- सोनेरी)
हौशी मंडळी तर आज कामापेक्षा जास्त करमणुकीस प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. काहींचा गुढशास्त्र या विषयात रुची निर्माण होईल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला बऱ्याच काळापासून रेंगाळलेल्या घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासातही लक्ष घालावे लागेल.

मिथुन (शुभ रंग – निळा)
नोकरदारांना आज बढती बदली विषयी बातम्या येऊ शकतील. मुले मात्र आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणीनी आज सासूबाईकडून शाब्बासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

कर्क (शुभ रंग- राखाडी)
आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदी व उत्साही दिवस असून खिशात पैसा खेळता राहणार आहे. काही हवे हवे असे वाटणारे पाहुणे घरी येतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त स्वतःचेच खरे कराल. इतरांचे ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. व्यवसायात असाल तर स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. गोडबोल्या मित्रांपासून मात्र सावध राहा.

कन्या (शुभ रंग- पांढरा) – Today’s Horoscope 15 December 2022 
आज तुम्ही संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचार आजच्या दिवस तरी सोडून द्या. घरातील थोरांच्या तब्येती विषयी चिंतेने तुम्ही त्रस्त असाल.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून जे जे चिंतल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकतो. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्य असच जास्त प्राधान्य द्यावे कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न मात्र दुर्लक्षित होणार आहेत त्यासाठी तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

धनु- (शुभ रंग- आकाशी )
आज तुम्हाला दैवाचे उत्तम पाठबळ असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. समाजातील प्रतिष्ठितांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करून घ्यावेसे वाटेल.

मकर ( शुभ रंग-आकाशी )
कोणतीही धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. आज स्वतःची काळजी घ्या. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवूच नका. विश्वासातील व्यक्तीकडूनच आज विश्वासघात होऊ शकतो.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी )
आज तुमच्या कुटुंबातील वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही घराबाहेरही आत्मविश्वासाने वावराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

मीन (शुभ रंग – केशरी )
आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती आकस्मिक रित्या वसूल होण्याची शक्यता आहे.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Bhosari News: पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बालनगरी प्रकल्प गुंडाळला; 20 कोटी पाण्यात!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.