Todays Horoscope 15 February 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 15.02.2022

  • शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पुष्य 13.48 पर्यंत नंतर आश्लेषा.
  • चंद्र राशी – कर्क.

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

शैक्षणिक क्षेत्राशी  संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज विलासी वृत्ती बळावेल. कदाचित प्रेमात पडाल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील.  अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)

सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा कुत्सित नजरेने बघतील, पण तुम्ही लक्ष देऊ नका. शब्दांवर थोडासा लगाम हवा.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात मध्यस्थी करतील. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

सिंह- ( शुभ रंग – सोनेरी)

आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.

तुळ – (शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक महत्त्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात उरकून टाका.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. प्रमोशन च्या मार्गातील अडथळे दूर होतील. एखाद्या मित्राला आज तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. अनोळखी व्यक्तींवर चुकूनही विश्वास ठेवू नका आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. सतर्क रहा.

धनु- ( शुभ रंग – केशरी)

आज तुमची एखाद्या क्षुल्लक कारणाने चिडचिड होऊ शकते. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. तरुणांनी गैरवर्तन टाळावे.

मकर- ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल.

कुंभ-( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे आवश्यक आहे. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. आज काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागणार आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. क्रीडा क्षेत्रातील मंडळी चांगली कामगिरी करतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.