Today’s Horoscope 15 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – गुरुवार दि. 15 जुलै 2021
- शुभाशुभ विचार — क्षयदिन
- आज विशेष – सामान्य दिवस.
- राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.
- दिशा शूल – दक्षिणेस असेल.
- आजचे नक्षत्र – उत्तरा.
- नक्षत्र पाया- चांदी.
- चंद्र राशी – कन्या.
—————————————
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच लपलेला असू शकतो सावध राहा. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नकोत.
वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )
काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतिनेही तुम्ही भारावून जाल.
मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )
व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळू लागेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. ध्येय साध्य करता येतील.
कर्क – ( शुभ रंग मरून)
आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल.
सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)
आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर राहाल. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल.
कन्या – ( शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.
तूळ – (शुभ रंग डाळिंबी )
आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. दूरचे प्रवास कार्यसाधक ठरणार आहेत.
वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.
धनु – ( शुभ रंग – निळा )
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील
मकर – (शुभ रंग – मोरपंखी )
आज मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील. ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.
कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल.
मीन – (शुभ रंग गुलाबी )
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज फक्त आय लव यू म्हटल्याने बरेचसे प्रश्न सुटतील.