-MPC-TOP-MOST-BANNER-I

Today’s Horoscope 15 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – मंगळवार, 15 जून  2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी ०३.००  ते ०४.३०.
  • दिशा शूल –  उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा २१.४२ पर्यंत. नंतर मघा नक्षत्र.
  • चंद्र राशी – कर्क २१.४२ पर्यंत व नंतर सिंह.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- पिस्ता)
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. कुठेही न जाता घरीच आराम करावा असा तुमचा मूड असेल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल.

वृषभ – (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होणार आहे.

मिथुन – (शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज आवक समाधानकारक असेल.

कर्क – (शुभ रंग- हिरवा)
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील

सिंह – (शुभ रंग -आकाशी)
ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – (शुभ रंग- पांढरा)
नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास जरा लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.

वृश्चिक – (शुभ रंग -जांभळा)
आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. क्षुल्लक कारणाने कारणाने घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.

धनु – (शुभ रंग -मोरपंखी)
कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तर मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.

कुंभ – (शुभ रंग-मोतिया)
अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.

मीन – (शुभ रंग-चंदेरी)
एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. आज प्रेम प्रकरणांसाठी ग्रीन सिग्नल आहे.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.