Today’s Horoscope 15 November 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – वार… रविवार,  दिनांक 15 नोव्हेंबर 2020

  • शुभाशुभ विचार –अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 6.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा 17.16 पर्यंत, नंतर अनुराधा.
  • चंद्र राशी –  तुळ 11.58 पर्यंत नंतर वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग – राखाडी)

हौस मौज जरूर करा. करा परंतु आपल्या मर्यादा सांभाळाव्या. कुसंगती पासून लांब रहा. वाहन चालवताना जरा जपून. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

वृषभ(शुभ रंग – डाळिंबी)

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहज सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

मिथुन  (शुभ रंग- पिस्ता )

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळले तर आजार बळावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल.

कर्क(शुभ रंग- क्रीम )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. महत्त्वाच्या कामाला आज विलंब होणार आहे. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील. कोर्टाची पायरी न चढलेली बरी.

सिंह- (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमप्रकरणे डोक्याला ताप देतील.

 

एमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. संततीकडून आज काही सुवार्ता येतील.

तूळ  – (शुभ रंग – लाल)

आज अनपेक्षितरित्या काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चही विविध मार्ग तुम्हाला खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अतिआत्मविश्वास आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकेल.

धनु  – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज रिकामटेकड्या चर्चेत तुमचा बराच वेळ फुकट जाईल. काही महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. दिवाळीनिमित्त नवी वस्त्रखरेदी कराल. आज आनंदी दिवस.

 

मकर – ( शुभ रंग- पांढरा)

उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घेण्यास विलंब होऊ देऊ नका. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाचा मान राहील. छान दिवस.

कुंभ  – (शुभ रंग- निळा)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे आज तुमची वाटचाल सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांबच राहा. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन (शुभ रंग- गुलाबी)

आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.
( MPC news च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीनिमित्त भरपूर शुभेच्छा🙏)
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.