Today’s Horoscope 15 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार…. गुरुवार. दिनांक…15.10.2020

  • शुभाशुभ विचार –क्षयदिन.
  • आज विशेष – शिवरात्री.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस  असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तरा 17.58 पर्यंत नंतर हस्त.
  • चंद्र राशी – कन्या.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच  लपलेला असू शकतो सावध राहा. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नकोत.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. ध्येय साध्य करता येतील.

कर्क – (शुभ रंग – मरून)
आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल.

सिंह – (शुभ रंग – सोनेरी)
आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर राहाल. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

तूळ – (शुभ रंग – डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. दूरचे प्रवास कार्यसाधक ठरणार आहेत.


वृश्चिक
 – (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

धनु – (शुभ रंग – निळा)
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील.

मकर – (शुभ रंग – मोरपंखी)
आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.


कुंभ
– (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज फक्त आय लव यू म्हटल्याने बरेचसे प्रश्न सुटतील.

 

!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.