Today’s Horoscope 16 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार -शुक्रवार. 16 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार — 18 नंतर चांगला.
  • आज विशेष – विनायक चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी 10.30  ते 12.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रोहिणी 23.40 पर्यंत नंतर मृग.
  • चंद्र राशी –  वृषभ.

.

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्च वाढत असला तरीही पैसा कमी पडणार नाही. रखडलेले उपक्रम पूर्ववत सुरू करता येतील. महत्त्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्द्यावर ठाम रहाल.

वृषभ – ( शुभ रंग- मरून)

आज तुमसे मनोबल उत्तम राहील तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल तब्येत ठणठणीत राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

 

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. काहींना दूरचे प्रवास घडतील.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्यात स्पर्धा वाढलेली असेल. जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या बातम्या येतील. अधिकारात वृद्धि होईल. घरगुती कामे दुर्लक्षीत होतील.

_MPC_DIR_MPU_II

कन्या –  ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडू शकतील. तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जातील.  सत्संगाने मानसिक बळ मिळेल. आज दानधर्म कराल.

तूळ –  (शुभ रंग- क्रीम)

आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या. विवाह विषयक बोलणी आज अजिबात नकोत.

वृश्चिक – ( शुभ रंग – लाल)

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा विरोध मावळेल. तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. कार्यक्षेत्रात काही नव्या संधी चालून येतील.

धनु –( शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. काही जुनी दुखणी डोके वर काढणार आहेत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही येणी असतील तर मागायला लाजू नका.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. गृहिणींना घर सजावटीच्या काही वस्तू आकर्षित करतील. आज एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ – (शुभ रंग- चंदेरी)

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले आज तुमच्या आज्ञेत असतील. गृहिणींना सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील.

मीन  – (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. काही वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.