Today’s Horoscope 16 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 16 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 16.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – दुर्गाष्टमी.

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30 .

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.
—————————–
मेष ( शुभ रंग- डाळिंबी)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात ही लक्ष घालणे गरजेचे आहे.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

आज नोकरदारांना बढती, बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा करू नये.

मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

कर्क ( शुभ रंग- मोतिया)

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच असावे.

सिंह ( शुभ रंग- आकाशी)

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे. बचतीचा विचार सोडून द्या. आज तुम्ही गरजे पुरते अध्यात्मिक ही व्हाल. वाद विवाद मात्र टाळा.

कन्या (शुभ रंग- राखाडी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचाच शब्द झेलतील.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघडच जाईल.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागणार आहे. आपल्या कुवती बाहेर असलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

विश्वासातील माणसेच विश्वासघात करू शकतात. आज महत्त्वाचे निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. वैवाहिक जीवनातही थोडेफार मतभेद संभवतात पण फार ताणू नका.

मकर (शुभ रंग- निळा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या वक्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज वैवाहिक जोडीदाराबरोबर चांगले सूर जुळतील.

कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)

काही मनाविरुद्ध घटना तुमच्या मनाला बेचैन करतील. मित्रांनी दिलेल्या आश्वासनावर अवलंबून राहू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषय नकोच.

मीन (शुभ रंग- पांढरा)

हौशीमंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गुढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.