Today’s Horoscope 16 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  बुधवार . ….. ​दि​.  16 डिसेंबर 2020

  • वार -बुधवार
  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – धनुर्मासारंभ.
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र -पूर्वाषाढा २०.०४ पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी –  धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)

नोकरदारांना काही जुन्या चुका निस्तारव्या लागतील. दैनंदिन कामातही काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. उच्चशिक्षितांना विदेश गमनाचे वेध लागतील.

वृषभ – ( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग-व्यवसायात काहीसे प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. आज केवळ भिडस्तपणाने आपल्या आवाक्याबाहेरील जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

मिथुन –  (शुभ रंग -मरून)

विवाहेछुकांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर पत्नीशी चर्चा करणे हिताचे राहील. नोकरीत आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल.

.

कर्क ( शुभ रंग -हिरवा)

कार्यक्षेत्रात काही झटपट लाभाच्या संधी येतील, पण अशा वेळी मनावर संयम ठेवणे हिताचे राहील. आज आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या. बेकायदेशीर व्यवहार टाळा.

_MPC_DIR_MPU_II

सिंह – (शुभ रंग – पांढरा)

उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. कलेच्या क्षेत्रात नवोदितांची हौस भागेल. आज किमती वस्त्र खरेदी कराल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुम्हाला काही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधू शकतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुले आज आज्ञाधारकपणे वागतील.

तूळ  ( शुभ रंग- भगवा)

आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना नोकरीचे कॉल येतील. आज तुम्हाला काही अति शहाण्या मंडळींचा सहवास लाभेल. घराबाहेर वाद टाळावेत.

वृश्चिक ( शुभ रंग – मोतीया)

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. उद्योग व्यवसायात योग्य वेळी काही अचूक महत्वपूर्ण निर्णय घ्याल.

धनु (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीपणे पूर्ण कराल.

मकर –  (शुभ रंग- राखाडी)

असा काही खर्च उद्भवेल कि जो टाळता येणार नाही. आज घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधित व्यवसाय आज तेजीत चालणार आहेत.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

आज काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संतती बाबत काही आनंददायी घटना घडणार आहेत. कार्यालयात केलेला कर्ज विनंतीचा अर्ज मंजूर होऊ शकतो. छान दिवस.

मीन  ( शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आज स्वप्नरंजनापेक्षा अथक प्रयत्नास प्राधान्य देणे गरजेचे आहे व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. अधिकारांचा योग्य वापर करा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.